Fitch Report : 2021-22 मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगाला मागे टाकेल

नवी दिल्ली – ग्लोबल रेटिंग एजेंसी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक नवा अंदाज व्यक्त केला आहे. फिचच्या अंदाजानुसार १ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताची अर्थव्यवस्था १२ टक्क्यापेक्षा ही जास्त वेगाने वाढेल. फिचने भारताच्या आर्थिक विकास दराचे जुना अनुमान अपडेट करुन नवीन अहवाल जाहीर केला. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, २०२१-२०२२ च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर १२.८ टक्के राहू शकतो.
फिचने पहिल्यांदा काय सांगितले होते
फिचने पहिल्यांदा २०२१-२०२२ च्या वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ११ टक्के राहू शकतो असा अंदाज वर्तवला होता. परंतु आता जे संकेत मिळत आहे त्यानुसार फिचने आपल्या हवालात सुधारणा केली आहे आणि पहिल्या तुलनेत १.८ टक्के दरात वाढ होण्याचा नवीन अंदाज व्यक्त केला आहे. फिचच्या अगोदर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि मूडीजने ही वित्तीय वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा इकोनॉमिक ग्रोथ रेट ११.५ टक्के आणि १२ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. पंरतु फिचचा जो नवीन रीपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये भारताच्या इकोनॉमिक ग्रोथचा रेट १२.८ टक्के होण्याचा अंदाज लावला आहे.
कोरोनाची लस ठरेल मोठा आधार
संपूर्ण जगात ज्या प्रकारे कोरोनाने हाहाकार पसरविला आहे, तो प्रत्येकजन अनुभवत आहे. लस भारताबरोबर बऱ्याच देशाने बनवली आहे. परंतु जितक्या कमी रुपयात भारताची लस बनवली गेली आहे, त्यामुळे भारत सर्वात पुढे आहे. भारतात लस प्रक्रियेचे लोक मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहे. नुकतेच नंदन नीलेकनि यांनी भारतातील लसीकरण प्रक्रियेचे मोकळ्या मनाने कौतुक केले आहे. इनफोसिसचे को-फाउंडर नंदन नीलेकनि यांनी तर मागणी केली आहे की, भारताला जगाचा वॅक्सीन कॅपिटल म्हणून घोषित केले पाहिजे.
सर्वात पुढे असेल भारत
भारताबरोबर फिचने २०२१-२०२२ मध्ये अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ रेट ६.२ टक्के राहिल असा अंदाज वर्तवला आहे. एजेंसीने या अगोदर अमेरिकेचा इकोनॉमिक ग्रोथ रेट ४.५ टक्के आसा अंदाज व्यक्त केला होता. चीनचा इकोनॉमिक ग्रोथ रेट ८.४ टक्के राहिल असा अंदाज होता. युरोपियन युनियनच्या इकोनॉमिक ग्रोथच्या अनुमानात कोणताही बदल केलेला नाही, हा पहिल्या प्रमाणेच ४.७ टक्के ठेवला आहे.





