नाकातोंडात मिरची पूड टाकून महिलेनं केली वृद्धाची हत्या
Updated On:

मुंबई – महिलेने वृद्धाचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नवीन पनवेल येथील ओवळे परिसरात घडली आहे. हत्या केल्यानंतर महिलेने घरातील 20 तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे.
बाळाराम चंदर पाटील, वय 60 असे मृत वृद्धाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीसांनी 24 तासाच्या आत महिलेसह मंगेश खेत्री यास बुलडाण्यातून अटक केली आहे. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





