महायुतीविरोधात पहिलं पाऊल? ठाण्यात मनसे अन् महाविकास आघाडी एकत्र येणार? जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टची जोरदार चर्चा

Jitendra Awhad post : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल केव्हाही वाजू शकते. यामुळे राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. थोडक्यात आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या जागावाटपाचा फॅार्म्युल्याविषयी चर्चा झडू लागल्या आहेत.
मात्र, जागांच्या बाबतीत रस्सीखेच होणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सगळ्यात आणखी एक चर्चा होत आहे, ती म्हणजे मनसे आणि शिवसेना एकत्र येणार? अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या एका पोस्टमुळे आगामी काळात महाविकास आघाडी आणि मनसेची युती होणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
नुकतीच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नाद निवासस्थानी आघाडी आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
View this post on Instagram
“मी, शिवसेना (उबाठा) चे माजी खासदार राजन विचारे, मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण अशा आम्हा चौघांमध्ये ठाण्यातील विविध प्रश्नांबाबत, नागरी समस्यांबाबत सुमारे तासभर चर्चा झाली.” असं पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. ठाण्यातील विविध समस्यांविषयी या बैठकीत चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी महायुतीविरोधात एकत्र येण्याच हे पहिलं पाऊल मानलं जात आहे.
ठाण्यातील ट्रॅफिकचा मुद्दा, पाणीटंचाईचा, रस्ते, वाहतूक कोंडी या मुद्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यासाठी विरोधी पक्ष एकवटताना दिसत आहेत. या बैठकीला मनसेचे नेते ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव हे देखील उपस्थित होते. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत मनसे युती करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
हेही वाचा : “भाजपने 100 जागेवर लढावं, आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे 50 लढतो, पण युती करा”; गुलाबराव पाटलांचे आवाहन





