रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाचा फर्स्ट रिव्ह्यू समोर…

Ramayana Film | बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून या चित्रपटाचे नवनवे अपडेट समोर येत आहेत. यातच आता ३ जुलै रोजी सिनेमाची पहिली झलक समोर येणार आहे. फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी पहिली झलक पाहिली असून त्यावर रिव्ह्यू दिला आहे. 7 मिनिटांचा हा लॉन्च टीझर खूपच शानदार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
#JaiShriRam… Just watched the first glimpse and a 7-minute vision showreel of the most-awaited epic – #Ramayana.
This glimpse of the timeless saga leaves you awestruck… Strong feeling: #Ramayana is not just a film for today, but for generations to come… #Boxoffice hurricane… pic.twitter.com/yJ1UcbOynZ
— taran adarsh (@taran_adarsh) July 1, 2025
फिल्म समीक्षक तरण आदर्श यांनी लिहिले की, “जय श्री राम, आताच मोस्ट अवेटेड महाकाव्य ‘रामायण’ची पहिली झलक आणि 7 मिनिटांचा व्हिजन शोरील पाहिला. टाईमलेस सागाची ही पहिली झलक तुम्हा सर्वांना हैराण करेल. स्ट्रॉन्ग फीलिंग आहे की, ‘रामायण’ फक्त आजचा सिनेमा नाही, तर येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी आहे. बॉक्स ऑफिसवर तुफान येणार आहे. या ऐतिहासिक प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी दूरदर्शी निर्माते नमित मल्होत्रा यांना खूप शुभेच्छा.”
नेटकऱ्यांनी केली ‘आदिपुरुष’ची तुलना
तरण आदर्श यांच्या पोस्टनंतर चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. मात्र, यावर अनेकांनी कमेंट्स करत लिहिले की, हा चित्रपट ‘आदिपुरुष’सारखा नसावा,’ दुसऱ्या एका युजरने लिहिले,’ ‘आदिपुरुष’नंतर बॉलीवुडवर विश्वास राहिलेला नाही.” दरम्यान, आदिपुरुष’ या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यामुळे चाहते प्रचंड निराश झाले होते. Ramayana Film |
रिपोर्ट्सनुसार, फिल्मचा पहिला पार्ट दिवाशी 2026 मध्ये आणि दुसरा पार्ट दिवाशी 2027 रोजी रिलीज केला जाणार आहे. रणबीर कपूर या चित्रपटात भगवान रामाची भूमिका साकारत आहेत. साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटात अभिनेता यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे, तर अभिनेता रवि दुबे भगवान लक्ष्मणाची भूमिका साकारणार आहे. Ramayana Film |
हेही वाचा:





