मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९ वा वाढदिवस आहे. आज जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर मोदींच्या जीवनावर आधारित मन बैरागी या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अभिनेता प्रभासने आज सकाळी ११:३० वाजता सोशल मीडियावर शेअर केले आहे.
#Prabhas unveils first look poster of #MannBairagi – based on PM #NarendraModi‘s life – on #Modiji‘s birthday… Directed by Ssanjay Tripaathy… Produced by Sanjay Leela Bhansali and Mahaveer Jain… In #Hindi, #Telugu, #Tamil and #English. #HappyBdayPMModi #HappyBirthdayPM pic.twitter.com/UWNahhOCgT
— taran adarsh (@taran_adarsh) September 17, 2019
चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. या चित्रपटाची निर्माते प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि महावीर जैन हे दोघे आहेत. तर संजय त्रिपाठी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तमिळ, तेलगू, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट १ तासाचा असणार आहे. मागील काही महिन्यांपूर्वी मोदींच्या आयुष्यावर आधारित असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.