Force 3 : फोर्स 3 ची पहिली झलक! जॅान अब्राहमसोबत हा अभिनेता अॅक्शन अवतारात
Force 3 : बहुचर्चित फोर्स 3 चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Force 3 : अभिनेता जॉन अब्राहम सध्या त्याच्या आगामी ‘फोर्स 3’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले असून, याची अपडेट निर्मात्यांनी सोशल मीडियावरून एक खास पोस्ट शेअर करत दिली आहे.
पोस्टमधून या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जॉन अब्राहम हातात बंदूक घेत दमदार अॅक्शन अवतारात दिसतो.
त्यानंतर त्याचा सामना हर्षवर्धन राणे याच्याशी होताना दाखवण्यात आला आहे. दोघेही दमदार लूकमध्ये दिसत असून त्यांच्या टक्करची झलक चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवणारी आहे. Force 3
View this post on Instagram
पोस्टच्या कॅप्शनमध्ये, “जेव्हा एक अजेय दुसऱ्या अजेयला भिडतो, तेव्हा एक वादळ जन्माला येते,” असे लिहिले आहे.
फोर्स फ्रँचायझीचा पहिला चित्रपट 2011 मध्ये रिलीज झाला होता. ज्यात अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मुख्य भूमिकेत झळकली होती. कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
त्यानंतर 2016 मध्ये ‘फोर्स 2’ प्रदर्शित झाला. ज्यात सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिका साकारली होती. आता ‘फोर्स 3’ हा चित्रपट 19 मार्च 2027 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. Force 3
‘फोर्स 3’ चे दिग्दर्शन भाव धुलिया करत असून निर्मिती स्वतः जॉन अब्राहमने केली आहे. या चित्रपटाचे लेखन सीमा हाश्मी यांनी केले आहे.दरम्यान या चित्रपटात कोणती अभिनेत्री दिसणार याची माहिती उघड करण्यात आलेली नाही.

