Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई कारखान्याची पहिली उचल 3600 रुपये जमा
Satara मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हंगाम सुरू झाल्यापासून महिनाभराच्या कालावधीत कारखान्याने जवळपास 80 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे.

Satara: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने 2026-27 च्या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकर्यांच्या गळितासाठी आलेल्या उसापोटी प्रतिटन 3 हजार 600 रुपयांप्रमाणे पहिली उचल संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा चालू गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. हंगाम सुरू झाल्यापासून महिनाभराच्या कालावधीत कारखान्याने जवळपास 80 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याने पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे पेमेंट अदा करण्याची कार्यवाही पूर्ण केली असून, ही रक्कम संबंधित ऊस पुरवठादारांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. ज्या शेतकर्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे, त्यांनी अधिक माहितीसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे. दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांनी आपला संपूर्ण ऊस लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास गाळपासाठी पाठवून चालू हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन चेअरमन यशराज देसाई यांनी केले आहे.





