संतोष देशमुख प्रकरणातील आज पहिली सुनावणी; उज्ज्वल निकम उपस्थित राहणार नाहीत

Santosh Deshmukh Case | मस्सोजाग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी वगळता सर्व आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने दोषारोपत्र दाखल केले ज्यातून धक्कादायक खुलासे झाले. यानंतर आज संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पहिली सुनावणी बुधवारी (ता. १२) केजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे. आरोपींना कोर्टात व्हिसीद्वारे हजर केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
वाल्मिक कराडने वकील बदलला
पहिल्या सुनावणीला ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम हे प्रकृती अस्वस्थामुळे उपस्थित राहू शकणार नाही. त्यांच्याजागी आज सरकारी पक्षाकडून सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हेच सरकार पक्षाकडून बाजू मांडणार आहेत. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये वाल्मिक कराडची बाजू अॅड खाडे हे मांडणार आहेत. तर वाल्मिक कराडने आपला वकील बदलला आहे. आतापर्यंत अशोक कवडे हे वाल्मिक कराडचे वकील म्हणून काम पाहत होते. मात्र यापुढे कोल्हापूर येथील वकील खाडे हे वाल्मिक कराडचे काम पाहणार आहेत. Santosh Deshmukh Case |
दरम्यान, आज अकरा वाजता सुनावणी अपेक्षित आहे. यावेळीआरोपींच्या वकीलाकडून काही अर्ज केले जाण्याची शक्यता आहे. तसेच साक्षीदाराचे जवाब आणि आरोपीचे जबाब यासोबतच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा आरोप पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्या सगळ्या फोन कॉलचे सीडीआर आरोपीचे वकील मागणार असल्याची माहिती समोर येत आहे. Santosh Deshmukh Case |
अद्यापही कृष्णा आंधळे फरार
या प्रकरणात अद्याप एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. मात्र मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेले वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि जयराम चाटे या प्रमुख आरोपींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत.
हेही वाचा:
Pune : पुणेकरांची ‘कोंडीतून’ सुटका होणार; विधानसभेत मोठी घोषणा, सरकाराचा नवा प्लॅन काय?





