औरंगाबादमध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला; राज्यात संख्या ३२वर
Updated On:

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे. औरंगाबादमधील ५९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ३२ वर पोहचली आहे.
माहितीनुसार, 59 वर्षीय महिला रशिया आणि कझाकिस्तानमधून प्रवास करून भारतात परतली होती. या महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धूत रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. या महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
दरम्यान, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्ताचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. पुणे 10, नागपूर 4, यवतमाळ 2, ठाणे 1, अहमदनगर 1, कल्याण 1, पनवेल 1, नवी मुंबई 1, मुंबई 5, औरंगाबाद 1 असे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.





