Raveena Tandon | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने दणदणीत विजय मिळवला. मात्र अभिनेत्री रविना टंडन हिने सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा घरोघरी जाऊन प्रचार केला. ती वांद्रे पश्चिम प्रभाग क्रमांक 101 मधून उभ्या असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवार अक्षता मेनेजेस यांच्यासाठी घरोघरी जाऊन मत मागत होती. रविनाने गळ्यामध्ये मशाल चिन्ह असलेला पट्टा घालून स्थानिक लोकांना भेट दिली. तिचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले होते. तसेच माध्यमांद्वारे तिने आपल्या चाहत्यांना सुद्धा मत देण्यासाठी आवाहन केले. मात्र गल्लीबोळात जाऊन घरोघरी जोरदार प्रचार करणारी रवीना ऐन मतदानाच्या वेळीच गायब झाली. गुरुवारी अनेक बॉलीवूड कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पण रवीना टंडन अजिबात दिसली नाही. त्यामुळे रवीना टंडनकडून अशी अपेक्षा नव्हती की तिने एकीकडे प्रचार केला पण तिची नागरी जबाबदारी पार पाडायला विसरली, असे म्हणत अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. पण आता तिच्या मतदान न करण्यामागचे कारण समोर आले आहे. एका वृत्तानुसार, रवीनाच्या घरात एक एमर्जन्सी आल्यामुळे तिला तात्काळ परदेशात जावे लागले. त्यामुळे ती मतदानाच्या दिवशी दिसली नाही. Raveena Tandon | हेही वाचा: Tejashri Pradhan: “ज्यांना खूश करण्यात तुम्ही कित्येक वर्षं घालवली…” तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत