जामखेड : शहरातील बीड रोडवर जुन्या वादातून सकाळी एकाने हवेत गोळीबार केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्यासह पोलीस पथकाने घटस्थळी भेट दिलीअसून तपास सुरू केला आहे.
गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. जामखेड शहरात शनिवारी अठवडी बाजार दिवशीच एका कापड दुकाना समोर जुन्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान जामखेड शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आहेत. दोन वर्षापुर्वी बीड रोडवरील मार्केट यार्ड समोर गोळीबार होऊन दुहेरी हत्याकांड घडले होते. शहरात गोळीबाराच्या वारंवार घटना घडत आसल्याने कायदासुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आसल्याचे चित्र समोर येत आहे.