Mumbai News | मुंबईतील कफ परेड परिसरातील मच्छिमार नगर परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत एका १५ वर्षीय मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकं काय घडलं? समोर आलेल्या माहितीनुसार, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, मच्छिमार नगर येथील एका चाळीमध्ये पहाटे ४ वाजता ही दुर्घटना घडली. चाळीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि बेस्टचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरू करून मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरात आग विझवली. आगीच्या विळख्यातून चार जणांना बाहेर काढण्यात आले आणिरुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने यातील १५ वर्षीय यश खोत या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांमध्ये देवेंद्र चौधरी (३०) या व्यक्तीची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, विराज खोत (१३) आणि संग्राम कुर्णे (२५) या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. Mumbai News | आगीचे कारण अस्पष्ट आग नेमकी कशामुळे लागली ह्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमुळे आग भडकल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, आगीच्या घटनेमुळे सदर चाळीतील लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. Mumbai News | हेही वाचा: “जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही तर…” ; डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी टॅरिफ लादण्याची धमकी