Pune | तळजाई टेकडीवरील वनक्षेत्रात पुन्हा आगीची झळ

Updated On:
Pune | तळजाई टेकडीवरील वनक्षेत्रात पुन्हा आगीची झळ

सहकार नगर (हर्षद कटारिया) – तळजाई टेकडीवर वनक्षेत्रात सिमाभिंती लगत आग लागल्याने येथील अनेक झाडे जळून खाक झाली तसेच जैवविविधता चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले येथे मागील १० ते १५ दिवसा पासून आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे वारंवार आग लागण्याच्या प्रकाराने वनक्षेत्रात मोर,ससे, साप, किटक अश्या वन्य प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे अनेक झाडे जळत आहेत.

रविवारी संध्याकाळी लागलेली आग पाहताच नागरिकांनी अग्निशामक दलाच्या १०१ क्रमांकावर फोन केला पण तब्बल पाऊन तासा नंतर अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या येथे सध्या रोजच आग लागत असून सदर परिसर कात्रज हद्दीत येत असून त्यामुळे गाडी येण्यास उशीर लागतो अशी माहिती अग्निशामक विभागाने फोन वर दिली.

मागील दहा दिवसांत रोज येथे आग लागल्याची घटना घडत आहे वनक्षेत्रात आग विझविण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून वनखात्याने एक तरी गाडीची सोय त्यांनी खात्याकडून करून ठेवणे गरजेचे आहे.

वनक्षेत्रात जाणीव पूर्वक कोणी तरी असे कृत्य करत असून आग लावत आहेत मागील दहा दिवस रोज आम्ही येऊन आग विझवत आहोत वाहतूक कोंडी मुळे टेकडीवर घटनास्थळी पोहचण्यास वेळ लागतो. – जयंवत तळेकर ,तांडेल हवलदार अग्निशामक दल कात्रज विभाग.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

2026-10-06 13:40:59

Hingoli News: हिंगोलीत फटाक्याच्या गोडाऊनला आग; दोन जणांचा मृत्यू, सात जण गंभीर जखमी

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

2026-10-06 06:30:39

PMC News: आरटीआय सप्ताहाच्या निमित्ताने महापालिकेला आली जाग; प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढण्याचे आदेश

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव

2026-10-06 06:00:53

Pune Water Supply: पुणेकरांच्या पाण्याचे नियोजन कळवा! अनिश्चित पर्जन्यमानामुळे महापालिकेची पाटबंधारे विभागाकडे धाव