Vivek Agnihotri: दिवाळीच्या फटाक्यामुळे पल्लवी जोशींच्या घरात आग; विवेक अग्निहोत्री संतापले, म्हणाले…
Vivek Agnihotri विवेक अग्निहोत्री यांनी या पोस्टमधून केवळ फटाके फोडणाऱ्या नागरिकांनाच जबाबदार धरले नाही, तर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. फटाक्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृती करणे, न्यायालयाच्या आदेशांची योग्य अंमलबजावणी करणे आणि अग्निसुरक्षेची काळजी घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, या पोस्टनंतर विवेक अग्निहोत्री यांनी आपली पोस्ट डिलीट केली आणि माफीही मागितली. त्यामुळे त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.

Vivek Agnihotri: दिवाळी हा आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. या सणानिमित्त अनेकजण घराची सजावट करतात, दिवे लावतात आणि फटाके फोडून आनंद साजरा करतात. मात्र, फटाके फोडताना केलेली थोडीशी निष्काळजीपणाही मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. याचाच प्रत्यय अभिनेत्री पल्लवी जोशी आणि त्यांचे पती, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या कुटुंबाला आला आहे. दिवाळीच्या रात्री त्यांच्या घराच्या बाल्कनीत फटाक्याचे रॉकेट येऊन पडले. त्यामुळे बाल्कनीतील सोफ्याने पेट घेतला. सुदैवाने त्यांच्या पाळीव कुत्र्यांनी वेळीच सावध केल्याने मोठी दुर्घटना टळली.
नेमकं काय घडलं?
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली होती. दिवाळीच्या रात्री त्यांच्या घराच्या बाल्कनीत एक रॉकेट येऊन सोफ्यावर आदळले. त्यानंतर सोफ्याला आग लागली. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, घरातील पाळीव कुत्र्यांनी वेळीच आवाज करून कुटुंबीयांना सावध केले. त्यामुळे त्यांना तातडीने परिस्थितीची जाणीव झाली.
विशेष म्हणजे, सोफ्याचे कापड अग्निरोधक असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही. अन्यथा या घटनेचे गंभीर परिणाम होऊ शकले असते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही किंवा मोठे नुकसान झाले नाही.

Vivek Agnihotri
‘हे आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही’
या घटनेनंतर विवेक अग्निहोत्री यांनी फटाक्यांच्या वापराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यांनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना टॅग करत आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला होता. महापौरांनी नागरिकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते. तसेच फटाके फोडताना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले होते. त्यांच्या याच पोस्टला प्रतिक्रिया देताना विवेक यांनी स्वतःच्या घरात घडलेली घटना सांगितली.
विवेक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, दिवाळीच्या रात्री त्यांच्या बाल्कनीतील सोफ्यावर रॉकेट आदळले आणि त्याला आग लागली. सुदैवाने त्यांच्या कुत्र्यांनी वेळेत सावध केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सोफ्याचे कापड अग्निरोधक असल्यानेही आग पसरण्यापासून रोखण्यास मदत झाली.
पुढे त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटनांची भीती त्यांच्या कुटुंबाला नेहमीच वाटत होती. यावेळी सुदैवाने कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. मात्र, अशी घटना एखाद्या दुसऱ्या घरात घडली असती, तर काय परिस्थिती निर्माण झाली असती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दिवाळी साजरी करायला कोणाला आवडत नाही? मात्र, इकडे-तिकडे पडणारी रॉकेट्स हा आपल्या संस्कृतीचा अभिमान नाही, तर आगीचा धोका आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली संस्कृती निष्पाप लोकांचे जीव, घरे आणि मालमत्ता धोक्यात घालण्याची शिकवण देत नाही, असेही त्यांनी म्हटले.
I am deleting my previous tweet. Neither do I want to be the reason for anyone’s outrage nor do I want to enable or weaken anyone’s cultural or environmental narrative.
Happy Diwali to everyone, once again.
🇮🇳 🪔— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) November 9, 2026
फक्त नागरिकच नाही, प्रशासनाचीही जबाबदारी!
विवेक अग्निहोत्री यांनी या पोस्टमधून केवळ फटाके फोडणाऱ्या नागरिकांनाच जबाबदार धरले नाही, तर प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. फटाक्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृती करणे, न्यायालयाच्या आदेशांची योग्य अंमलबजावणी करणे आणि अग्निसुरक्षेची काळजी घेणे ही संबंधित अधिकाऱ्यांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, या पोस्टनंतर विवेक अग्निहोत्री यांनी आपली पोस्ट डिलीट केली आणि माफीही मागितली. त्यामुळे त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
फटाके फोडण्याचा आनंद घेताना इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. सणाचा आनंद साजरा करताना आपल्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्यांच्या जीवाला किंवा मालमत्तेला धोका निर्माण होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.





