मुंबईत घाटकोपर परिसरात एका गोदामाला भीषण आग

Updated On:

मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबईतील घाटकोपर भागातील एका गोदामाला सोमवारी सकाळी भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे पर्यंत चालू आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने गोदामाला लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

असल्फा परिसरातील सुंदरबाग भागातील डी सिल्वा कंपाऊंडमध्ये असलेल्या एका गोडाऊनमध्ये सकाळी 10.30 च्या सुमारास आग लागली,अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.असे येथील अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले आहे.

दरम्यान, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

आणखी संबंधित बातम्या

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

2026-10-04 14:53:43

Gunaratna Sadavarte : 'राज आणि उद्धव ठाकरे यांचा मोर्चा बेकायदेशीर, त्यांना अटक करा'; गुणरत्न सदावर्तेंची मागणी

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

2026-10-04 13:16:25

Raj Thackeray : गर्जना मोर्चात राज ठाकरेंच्या दोन मोठ्या मागण्या; म्हणाले....

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

2026-10-04 11:10:03

Sanjay Raut : मोदी-शाहांचं नाव घेतलं, संजय राऊत मोर्चाच्या दिवशी थेट म्हणाले "केवळ ज्ञानेश कुमार यांनाच नाही तर..."

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

2026-10-04 08:18:00

Mumbai Morcha: ठाकरे बंधुंची ज्ञानेश कुमारांविरोधात आज मुंबईत 'गर्जना'; काँग्रेस-शरद पवार गटाचा मोर्चाला पाठिंबा

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

2026-10-03 16:37:22

Harshwardhan Sapkal : तरुणांचा आवाज दाबण्यासाठी केसेस दाखल केल्या जात आहेत; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप