अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाला भीषण आग; 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू

Updated On:

नगर – जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागास आज सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली आहे. या आगीत 10 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या या अतिदक्षता विभागात साधारण 20 ते 25 जण उपचार घेत होते.

भीषण आग लागल्याने परिस्थिती तणाव जनक निर्माण झाली. काही वेळातच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी व परिसरातील नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन या अतिदक्षता विभागात धाव घेतली व रुग्णांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले होते. संपूर्ण आय. सी. यु विभाग या आगीत जळून खाक झाला. यात 10 जणांचा बळी गेला आहे.

मात्र , तशी अधिकृत माहिती मिळाली नाही. त्याबाबत जिल्हा रुग्णालयकडून स्पष्टीकरण देण्यात आले नाही. घटनास्थळी आमदार संग्राम जगताप दाखल होऊन रुग्णांवर तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. यातील काही गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात हलवण्याची गरज असल्यास तातडीने संबंधित रुग्णांना हलवा, अशा सूचना त्यांनी दिल्या. या घटनेची सखोल माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा जिल्हाधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली.

आणखी संबंधित बातम्या

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

2026-09-11 05:00:25

Junnar News: 'चांदीची मोड द्या, दागिने घ्या...' बहाणा करून महिलांनी मारला डल्ला? बेल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

2026-09-06 22:45:01

Newasa News : नेवाशात संतापाचा स्फोट! ऋषिकेश शेटे यांच्यावरील हल्ल्याविरोधात हजारो हिंदू रस्त्यावर; प्रशासनाला निर्वाणीचा इशारा

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

2026-08-30 14:31:36

Reserve Bank of India : RBIकडून महाराष्ट्रातील 'या' बँकेवर निर्बंध; खात्यातून रक्कम काढता येणार नाही

National Sports Day: अहिल्यानगरच्या शिलेदारांचा भारतीय क्रिकेटमध्ये ‘डंका’!

2026-08-29 07:35:13

National Sports Day: अहिल्यानगरच्या शिलेदारांचा भारतीय  क्रिकेटमध्ये ‘डंका’!

Amravati Hospital: ‘आमचे बाळ परत द्या...’ ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पदरी फक्त दु:खचं, रुग्णालयाबाहेर पालकांचा आक्रोश

2026-08-24 10:50:28

Amravati Hospital: ‘आमचे बाळ परत द्या...’ ९ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पदरी फक्त दु:खचं, रुग्णालयाबाहेर पालकांचा आक्रोश