Deepak Hooda : भारताचा स्टार कबड्डीपटू दीपक हुडा याच्याविरोधात FIR दाखल; काय आहे नेमकं प्रकरण?

क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतातील प्रसिद्ध कबड्डीपटू दीपक हुडा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे दीपक हुडा यांच्या पत्नी स्वीटी बोरा यांनी ही FIR दाखल केली आहे. त्यांनी FIR मध्ये दीपक आणि त्यांच्या कुटुंबियांवर हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यामुळे दीपक हुडा यांच्या समोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दीपक हुड्डा आणि स्विटीने 2022 मध्ये लग्न झाले होते. या लग्नाच्या तीन वर्षानंतर स्विटीने हु़ड्यासाठी छळल्याचा आरोप केला आहे.स्वीटीने हरियाणातील हिसार येथे हुड्डाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. “स्वीटी बोरा यांनी तिचा पती दीपक हुड्डा यांच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीच्या आधारे २५ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला.
दीपक हुड्डा यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याने दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघासोबत सुवर्णपदक जिंकले आहे. तो भारतातील सर्वात प्रसिद्ध प्रो कबड्डी लीगचा देखील भाग राहिला आहे.दीपक हुड्डाची पत्नी स्वीटी बोरा हिला अर्जुन पुरस्कार मिळाला आहे. ती बॉक्सिंगमध्ये माजी विश्वविजेती आहे.





