प्रचार राष्ट्रवादीचा; गुन्हा मात्र रिक्षा चालकांवर

पिंपरी – राष्ट्रवादीचा झेंडा आणि बॅनर लावून प्रचार करण्यात आला. पक्षाचा प्रचार असला तरी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 13) भोसरी येथे घडली.

उपनिरीक्षक संदीप ओहोळ (वय 33) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच-14-एचएम-3261 आणि एमएच-14-जीसी-2069 या दोन रिक्षाचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी विधानसभा क्षेत्राच्या हद्दीत दोन रिक्षा चालकांनी आपल्या रिक्षावर बॅनर आणि राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा लावून आदर्श आचारसंहितेचा भंग करत प्रचार करत असल्याचे फोटो प्राप्त झाले. त्या फोटोंमध्ये रिक्षाचा क्रमांक दिसत असल्याने त्यानुसार आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.