Pimpri : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या समस्यांवर तोडगा काढा

पिंपरी : राज्यातील ऑटो, टॅक्सी व कॅब चालक-मालकांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात यशस्वी बैठक पार पडली. डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनच्या शिष्टमंडळाने ही बैठक घेतली.
ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप-आधारित कंपन्यांनी शासन नियमांचे उल्लंघन करून कमी दरात सेवा देत चालकांचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या कंपन्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले.
बैठकीत CNG बाटली पासिंग दर, बेकायदेशीर वाहतूक, मुक्त परवाने बंद करणे आणि कल्याणकारी महामंडळाची अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली.
डॉ. कांबळे यांनी कोणत्याही विनाकारण बंदात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करत, जबरदस्ती करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. वाहतूक क्षेत्रात नियमबद्धता आणि चालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वास या बैठकीतून व्यक्त झाला.





