कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा

Kurla Bus Accident | मुंबईतील कुर्लामध्ये भीषण अपघात घडला आहेत. एका भरधावबेस्ट बसने अनेक पादचाऱ्यांना उडवले. कुर्ला एलबीएस मार्गावरच्या मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेकांना धडक दिली. या अपघातात 49 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. तर सात जणांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर बेस्ट बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केला आहे. तसेच कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना…
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 10, 2024
या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
कुर्ला येथील बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरे (54) या बस चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात गस्तीवर असलेले चार पोलीस आणि एमएसएफ जवान ही जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या अधिकाऱ्याच्या फिर्यादीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट
संजय मोरेने अपघाताच्यावेळी मद्यप्राशन केले होते का?, हे तपासण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. मात्र, या चाचणीत संजय मोरे याने मद्यप्राशन केले नसल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इलेक्ट्रिक बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचेही बेस्टकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
जगदीप धनखड यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव? ; अध्यक्षांनी बोलावली नेत्यांची बैठक





