Union Budget 2025 : अर्थमंत्र्यांच्या भाषणात नव्या करप्रणालीचा उल्लेख; ६३ वर्षांपूर्वींचा जुना आयकर कायदा इतिहास जमा होणार?

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये मोठ मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सगळ्यात महत्वाची घोषणा या अर्थसंकल्पात मानली जाते ती म्हणजे १२ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर यापुढे कोणताही इनकम टॅक्स भरावा लागणार नाही. थोडक्यात १२ लाखपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्यात आले आहे. यामुळे नव्या करप्रमाणीत हा सर्वात मोठा बदल असल्याचे मानले जात आहे. यामुळे ६३ वर्षांपूर्वीचा जुना आयकार कायदा लवकच इतिहास जमा होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना त्यांच्या भाषणात इनकम टॅक्स बिलाचा उल्लेख केला आहे. हे इनकम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात मांडण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे बिल तयार करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती अगोदरच गठित करण्यात आली आहे. त्यासाठी या समितीमधील सदस्यांनी सहा महिन्यांपासून मोठी कसरत घेतली असल्याचे समजते. सरकार या विषयीचे बिल आणि विधेयक पुढच्या आठवड्यात सादर करणार आहे. त्यानंतर या बिलावर करदाते आणि तज्ज्ञांच्या हरकती मागवण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन कर सुधारणा कायदा तयार केला जाणार आहे.
हे नवीन करप्रणाली असणारे बिल पुढच्या आवड्यात (Direct Tax Code (DTC) 2025) सादर करण्यात येणार असून या नव्या सुधारित रुप अत्यंत सोपे आणि सुटसुटीत असणार आहे. मोदी सरकारने हे बिल सादर केल्यानंतर त्यात केंद्र सरकार आयकर कायद्यात बदल करेल, असे सांगितले जात आहे.
मोदींच्या नेतृत्वातील अर्थव्यवस्था गतिमान
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पाचे सादरीकरणाच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा कारभार सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वामुळेच देशाची आर्थिक व्यवस्था अधिक गतिमान झाली असून ही अर्थव्यवस्था अजूनही गतिमान होईळ, असे म्हटले आहे.





