व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी अर्थमंत्री सितारामन ब्रिटनच्या दौर्यावर
Updated On:

नवी दिल्ली – व्यापार युद्धाच्या काळात विविध देशाबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून अर्थमंत्री निर्मला सीतारामन आठ एप्रिलपासून ब्रिटनच्या आणि ऑस्ट्रेलियाच्या एक आठवड्याच्या दौर्यावर जाणार आहेत. यावेळी सितारामन ब्रिटनच्या अर्थमंत्र्याबरोबर चर्चा करतील. त्याचबरोबर ब्रिटनमधील गुंतवणूकदार व उद्योजकांची चर्चा करणार आहेत.
गिफ्ट सिटीमधील सहकार्य, विमा, पेन्शन फंड, डिजिटल अर्थव्यवस्था, वित्तीय तंत्रज्ञान या विषयावर सहकार्य वाढविण्यासाठी भारत आणि ब्रिटन प्रयत्न करणार आहेत. अमेरिकेशिवाय इतर देशाबरोबर गुंतवणूक आणि व्यापार सहकार्य वाढविण्याचा प्रयत्न जारी राहणार आहेत.





