Jay Bhanushal Announce Divorce | टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय जोडी जय भानुशाली आणि माही विज यांच्या घटस्फोटाच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू होत्या. अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. अधिकृतरित्या दोघांनी घटस्फोट घेतला आहे. नुकतेच सोशल मिडियावर दोघांनी एकत्र स्टेटमेंट देत घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं आहे. लग्नाच्या तब्बल 14 वर्षांनंतर जय आणि माही विभक्त झाले आहेत. काही वर्षांपासून या दोघांच्या नात्यात समस्या होत्या. दोघांनीही आपलं नातं वाचवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु या प्रयत्नांना यश मिळालं नाही. अखेर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता. तेव्हापासून दोघं वेगवेगळे राहत होते. घटस्फोटानंतरही आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जय आणि माहीची पोस्ट- ‘आयुष्याच्या या प्रवासात आज आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेत आहोत. तरीही आम्ही एकमेकांना साथ देत राहू. शांती, प्रगती, दयाळूपणा आणि माणुसकी ही नेहमीच आमची आयुष्यात मार्गदर्शक मूल्ये राहिली आहेत. आमची मुलं- तारा, खुशी आणि राजवीर यांच्यासाठी आम्ही सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम मित्र बनून राहू. त्यांच्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी आणि जे काही भविष्यात करावं लागेल ते करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलंय. पुढे त्यांनी म्हटले की, ‘जरी आम्ही वेगवेगळा मार्ग निवडला असला तरी या कथेत कोणीच खलनायक नाही आणि या निर्णयाशी कोणतीही नकारात्मकता जोडलेली नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी कृपया हे जाणून घ्या की आम्ही ड्रामापेक्षा शांतता आणि इतर सर्व गोष्टींपेक्षा सामंजस्याला महत्त्व देतो. आम्ही नेहमीप्रमाणे एकमेकांचा आदर करत राहू, एकमेकांना पाठिंबा देत राहू आणि मित्र म्हणून परस्पर आदराने राहू. आयुष्यात पुढे जात असताना तुमच्याकडून आदर व प्रेम मिळावं अशी आमची ईच्छा आहे.’ Jay Bhanushal Announce Divorce | दरम्यान, माही आणि जय यांनी 2011 मध्ये लग्नगाठ बांधली होती. 2017 मध्ये त्यांनी राजवीर आणि खुशी या दोन मुलांना दत्तक घेतलं. त्यानंतर 2019 मध्ये माहीने मुलीला जन्म दिला. अनेकदा दोघे मुलांसोबत अनेक फोटो सोशल मिडियावर शेअर करत असे. मात्र त्यांच्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर चाहतेही अचंबित झाले आहेत. Jay Bhanushal Announce Divorce | हेही वाचा: ओडिशात दगड खाणीत भीषण स्फोट! दोन मजुरांचा मृत्यू; अनेक मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती