अखेर कंगणाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Emergency Movie | अभिनेत्री आणि खासदार कंगणा रणावतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या चित्रपटात कंगणा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते देखील या चित्रपटाबाबत उत्सुक आहेत. यातच आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी 14 ऑगस्टला कंगनाच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
कंगनाने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. सोबतच तिने लिहिले की, “भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसाचे साक्षीदार व्हा. सत्तेच्या लालसेने ज्यांनी संपूर्ण देश जाळून टाकला. १४ ऑगस्टला ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय आणि आणीबाणीची विस्फोटक कथा ६ सप्टेंबरला जगभरातील चित्रपटगृहामध्ये पाहता येणार आहे.”
View this post on Instagram
दरम्यान, याआधी 14 जूनला ‘इमर्जन्सी’ प्रदर्शित होणार होता. पण लोकसभा निवडणुकीत कंगनाला भाजपकडून हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले. त्यामुळे कंगना प्रचारात आणि मतदारसंघातील कामात व्यस्त होती. त्यामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकण्यात आली होती. अखेर 6 सप्टेंबरला ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, कंगनाने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे.
हेही वाचा:
Haryana : गॅस सिलिंडर फक्त 500 रुपयांत; ‘हर घर हर गृहिणी योजना’ पोर्टल लॉन्च





