मुंबई – अभिनेत्री ‘आलिया भट्ट’ आणि अभिनेता ‘रणबीर कपूर’ बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांपासून आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे यांच्या लग्नाच्या चर्चाही होताता दिसून येत आहेत. दोघांचेही चाहते लग्न कथी करणार आहे? अशी सोशल मिडियावर विचारणा करत आहेत. आलियाने लग्नाबासंदर्भात एका मुलाखतीत सांगितले की… ‘माझ्या मनात मी आधीच रणबीरशी लग्न केले आहे. खरं तर, मी रणबीरशी खूप दिवसांपूर्वीच लग्न केले आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, आता जेव्हाही आम्ही लग्न सोहळा करू तो खूप चांगल्या पद्धतीने होईल.’ असं ती म्हणाली होती. तर, रणबीरनं सुद्धा यावर आपलं मत व्यक्त केलं होत. रणबीर म्हणाला होता… ‘जर करोना नसता तर एप्रिल 2021 मध्येच त्याचं आणि आलियाचं लग्न झालं असतं’. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर रणबीर आणि आलिया लगेचच लग्नगाठ बांधू घेऊ शकतात असं बोललं जात आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या तारखेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यापूर्वी, असे समोर आले होते की, बॉलीवूडचे हे क्यूट कपल डिसेंबर 2022 मध्ये रेशीमगाठ बांधतील. मात्र, रणबीर कपूर आणि अलीकडे भट्ट यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.