Tanya Maniktala : गेल्या काही दिवसांपासून चित्रपट वर्तुळात अशी चर्चा आहे की किल फेम अभिनेत्री तान्याने आगामी चित्रपट अमारीमध्ये अनन्या पांडेची जागा घेतली आहे. या सुरू असणाऱ्या चर्चांवर अखेर तान्याने मौन सोडले असून याबाबत स्वतः खुलासा केला आहे. अभिनेत्री तान्या माणिकतला अमारी चित्रपटात अनन्या पांडेची जागा घेणार का? असा प्रश्न या चर्चांनामधून समोर आला आहे. सोशल मीडियावर देखील याविषयी चर्चा रंगताना दिसत आहेत. किल फेम अभिनेत्री तान्या प्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण नुकतेच तान्याने स्वतः पुढे येत या अफवांना पूर्णविराम दिला असून मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तान्या म्हणाली, “ही बातमी कुठून आली हे मला माहित नाही. आमच्याकडे या चित्रपटाबद्दल कोणतीही माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.” तिने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर ‘अमरी’ चित्रपटाच्या कलाकारांच्या निवडीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, तान्याने राजकुमार रावसोबत आणखी एका चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तिने नव्या प्रोजेक्टबाबत उघडपणे चर्चा केली नसली तरी, त्याच्यासोबत काम केल्याचे मान्य केले आहे. ‘अमारी’ हा चित्रपट अमृता शेर-गिल यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. या चित्रपटात त्याच्या कला, संघर्ष आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर भाष्य करण्यात येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ‘अमारी’ चित्रपटाचे चित्रीकरण भारताच्या विविध भागात तसेच हंगेरी आणि फ्रान्समध्ये केले जाणार आहे. चित्रपटाची कथा तिचे वडील उमराव सिंग शेरगिल, पती व्हिक्टर एगन, मंगेतर युसूफ अली खान यांच्यासोबतृ जोडलेल्या भावनिक संबंधांतना देखील स्पर्श करेल. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी विक्की कौशल, जिम सर्भ आणि नसीरुद्दीन शाह सारख्या काही प्रसिद्ध कलाकारांशीही संपर्क साधला असल्याची माहिती आहे. हेही वाचा : वयस्कर लोक तरुणांपेक्षा अफेअर्स उत्तमरित्या लपवतात”; ट्विंकल खन्नाचे विधान पुन्हा एकदा चर्चेत