मुंबई – शरद पवार यांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर सदावर्ते यांच्या विरोधात अनेक ठिकाणी तक्रार नोंदवण्यात आले. ज्यामुळे विविध ठिकाणच्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पण अखेर आज त्यांना दिलासा मिळाला असून त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.
गुणरत्न सदावर्ते 18 दिवसनंतर बाहेर आले आहेत. जेल बाहेर सदावर्ते यांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक आणि मित्रपरिवार जमला होता. त्यांनी यावेळी घोषणा दिल्या. हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आहे. भारताच्या संविधानापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, असे यावेळी ते म्हणाले.
महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी जे करता येईल ते करु. भ्रष्टाचाराविरोधात लढू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पुण्यात दाखल एफआयआरबाबतही सदावर्तेंना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला.
गुणरत्न सदावर्ते यांनी आर्थर रोड जेलमध्ये उपोषण सुरु केल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली होती. त्यांनी अन्न न घेण्याचं ठरवलं होतं. पुण्यात भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात वकील गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पुणे पोलिसांना सदावर्तेंचा ताबा हवा होता. पण न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.