अखेर सीएसआर फंडातून पोलिसांना पाच वाहने

आयुक्‍तालयाला दिलासा ः वाहन उत्पादक कंपनीकडून मदतीचा हात

पिंपरी 
– अपुरे मनुष्यबळ आणि त्याहूनही कमी आणि तीही नादुरुस्त वाहने अशी ओळख निर्माण झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्‍तालयाला एका वाहन उत्पादक कंपनीने मोठा दिलासा आहे. गस्त कशी घालावी, घटनास्थळी कसे पोहचावे अशा समस्यांना 24 तास तोंड देत असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या वतीने आयुक्‍तांनी सीएसआर (कार्पोरेट सोशल रिस्पॉंसिब्लिटी फंड) अंतर्गत आम्हाला वाहने द्या, असे आवाहन उद्योगांना केले होते. अखेर वोक्‍सवॅगन कंपनीने पुढाकार घेऊन पाच नव्या-कोऱ्या चारचाकी पिंपरी-चिंचवड पोलिसांना देऊ केल्या आहेत.

उल्लेखनीय बाब अशी आहे की, पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्‍तालय तर देण्यात आले परंतु आयुक्‍तालयासाठी आवश्‍यक असणारे मनुष्यबळ देण्यात आले नाही. लोकसंख्या आणि विस्ताराच्या तुलनेत खूपच कमी मनुष्यबळ असलेल्या पोलीस आयुक्‍तालयासमोर सर्वांत मोठी समस्या ही वाहनांची होती. अगदी मोजक्‍या वाहनांवर पोलिसांचा कारभार चालला होता.
कित्येकदा मागणी करुनही सरकारकडून वाहने मिळाली नाहीत. अखेर पोलीस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी सीएसआर अंतर्गत वाहने मिळवण्याची परवानगी मागितली. पोलीस महासंचालकांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर पोलिस आयुक्‍तांनी चाकण येथील कंपन्याना मदतीसाठी आवाहन केले होते. जुनी वाहने मिळाली तरी चालतील, अशी सुरुवातीला अवस्था असणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस ऐन निवडणुकीपूर्वी पाच नवी कोरी वाहने मिळाल्याने आयुक्‍तालयातील अधिकाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आज गुरवार (दि. 4) एप्रिल रोजी आयुक्‍त कार्यालयाला वोक्‍सवॅगन कंपनीकडून सीएसआर फंडातून पाच अलिशान गाड्या देण्यात आल्या आहेत. वाहनाअभावी पोलिसांची गैरसोय कमी करण्यासाठी आयुक्‍तांनी सीएसआर फंडातून वाहने मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. गुरुवारी कंपनीचे सीआरएस हेड पंकज गुप्ता यांनी पोलीस आयुक्‍त आर. के पद्मनाभन यांना गाड्यांच्या चाव्या सुपुर्द केल्या. यावेळी कंपनीचे अकाऊंट हेड कौशिक बासु, बियु भंडारी, बाळासाहेब सहाणे, शैलेश भंडारी, वैजंती शेवाडे, अप्पर आयुक्‍त मकरंद रानडे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.