Buldhana News | स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत वंचित, काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे अखेर निश्चित झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यात वंचित-बहुजन आघाडी एकत्र लढणार असून दोन्ही पक्षांमध्ये ५०-५० टक्के जागावाटप निश्चित झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सात नगरपालिकांमध्ये निवडणुका आहे. यात बुलढाणा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, लोणार, खामगाव, शेगाव आणि जळगाव जामोद या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुका वंचित-काँग्रेस युतीमध्ये लढवणार आहे. या आधारे नगरपालिकांच्या निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी वंचितसोबत स्थानिक पातळीवर युती करणार असल्याचे सांगितले होते. अखेर बुलढाण्यामध्ये वंचित आणि काँग्रेस अधिकृतरित्या एकत्र आले आहेत. Buldhana News | दरम्यान, वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व उमेदवार, संघटनात्मक तयारी, प्रचार आराखडा आणि कार्यकर्त्यांचे नियोजन पूर्ण केल्याचे वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा प्रभारी प्रदीप वानखेडे यांनी सांगितले. तसेच या युतीमुळे जिल्ह्यात मजबूत पर्याय उभा राहील आणि दोन्ही पक्षांना चांगले यश मिळेल. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची ही युती जिल्ह्यात चांगले यश संपादन करेल, याची मला पूर्ण खात्री आहे, असाही विश्वास असा विश्वासही वानखेडे यांनी व्यक्त केला. Buldhana News | हेही वाचा: “प्रफुल्ल पटेल आतापर्यंत पैशांच्या भरोशावर राजकारण करत आले, आणि…” नाना पटोलेंची टीका