तळेगाव दाभाडे– तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणूक २०२५ साठीची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी ही यादी नगर परिषद कार्यालयात प्रसिद्ध केली. या यादीत एकूण ६४,६७८ मतदारांची नोंद असून, त्यात पुरुष मतदार ३३,३०१, महिला मतदार ३१,३७५, आणि इतर मतदार २ आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक सन २०१६ मध्ये झाली होती. त्यावेळी भाजपाचे १४, तळेगाव दाभाडे शहर सुधारणा समितीचे ६, तर जनसेवा विकास समितीचे ६ नगरसेवक विजयी झाले होते. नगराध्यक्षा म्हणून भाजपाच्या चित्रा जगनाडे निवडून आल्या होत्या. या प्रतिनिधींनी जानेवारी २०२२ पर्यंत कामकाज पाहिले. त्यानंतर नगरपरिषदेत प्रशासकीय राजवट लागू झाली.