पुणे जिल्हा | लाडकी बहीण समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी भरणे
Updated On:

इंदापूर, (प्रतिनिधी)– मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समितीच्या इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षपदी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी भरणे यांच्या नियुक्ती केल्याचे आदेश 29 जुलै रोजी एका आदेशाच्या आधारे काढले आहेत.
आमदार भरणे यांच्यासह या एकूण 11 सदस्य या समितीचे कामकाज पाहणार आहेत. यापूर्वी आमदार भरणे यांनी तालुक्यातील गोरगरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर तसेच गावोगावी या योजनेसाठी शिबिरे आयोजित केली होती. तसेच अधिकार्यांच्या मदतीने स्वतंत्र शिबिरे गावोगावी भरवून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ देण्यास प्राधान्य दिले आहे.





