सोलापूर – आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजप प्रवक्ते नुपूर शर्मा व नवीन जिंदाल यांना अटक करा या मागणीसाठी एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व मुस्लीम राजकीय नेते, मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता.
शुक्रवार असल्याने दुपारच्या नमाज नंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चामध्ये मुस्लिम बांधवांनी भारताचा तिरंगा ध्वज, हिरवे झेंडे आणि निषेधाचे काळे झेंडेही हाती घेतले होते.
हा मोर्चा पासपोर्ट कार्यालयाच्या समोरून निघून सिद्धेश्वर प्रशाले मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटला येणार होता. मुस्लिम समाजातील युवकांची हजारोंची गर्दी पाहता पोलीस प्रशासनाने या मार्गावरील सर्व दुकाने बंद केले आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या मार्गावर मोठा बंदोबस्त लावला होता.
फोटो आहे