#IPL2022 | आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; बीसीआयने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर बीसीसीआयकडून आयपीएल चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील पुणे आणि मुंबईतील चार स्टेडियमवर रंगत असलेल्या आयपीएल सामन्यासाठी स्टेडियमच्या प्रेक्षक क्षमतेच्या 50 टक्के तिकीटे विक्री केली जाणार आहेत.
सध्याच्या घडीला 25 टक्के प्रेक्षकांना स्टेडियमवर प्रवेश दिला गेला. मात्र, आता आगामी सामन्यासाठी स्टेडियममध्ये 50 टक्के प्रेक्षक क्षमतेने प्रवेश देण्यासंदर्भात बीसीसीआय तयार असल्याचे सांगितले जात आहे. बीसीसीआय 5 एप्रिलपासून होणाऱ्या सामन्यांना 50 टक्के प्रेक्षक क्षमतेसह सामने खेळवण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यासह मुंबईतीलही तीन स्टेडियमवर प्रेक्षकांचा गलका दिसणार आहे.
मास्क बंधनकारक
सरकारने 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली असली तरीही मैदानावर उपस्थित राहताना मात्र, प्रेक्षकांना मास्क वापरावाच लागणार आहे. करोनाचे निर्बंध मागे घेतले गेले असले तरीही पुढील काही दिवस गर्दीच्या ठीकाणी मास्कचा वापर करावाच लागणार आहे.
या सामन्यात स्टेडियमच्या क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल.





