Bangladesh border – पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर, ४५० किलोमीटरच्या खुल्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलल अर्थात बीएसएफला जमीन वाटप करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कुंपणासाठी बीएसएफला जमीन वाटप करण्याची घोषणा केली. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया ४५ दिवसांत पूर्ण केली जाईल. ही प्रक्रिया राज्याचे मुख्य सचिव आणि भूमी व महसूल सचिव यांच्या देखरेखीखाली पार पडेल. या योजनेअंतर्गत, पश्चिम बंगालला लागून असलेल्या बांगलादेश सीमेवरील ४५० किलोमीटर लांबीचा खुला भाग कुंपणाने व्यापला जाईल. प्रत्येक ३० किलोमीटरवर एक बटालियन मुख्यालय स्थापन केले जाईल, म्हणजेच १,००० सैनिक तैनात केले जातील. पश्चिम बंगालची बांगलादेशसोबत २,२१६ किलोमीटरची सीमा आहे. यापैकी १,६५३ किलोमीटरवर कुंपण घालण्यात आले आहे. अंदाजे ५६३ किलोमीटरचा भाग खुला आहे. यापैकी ११२ किलोमीटरचा भाग नद्या, ओढे आणि उंचवट्याच्या प्रदेशाने व्यापलेला आहे. Bangladesh border : बांगलादेश सीमेवर कुंपणाच्या कामाला गती; ४५० किलोमीटरचा भाग आहे कुंपणविरहित येथेही कुंपण घालण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु ४५० किलोमीटरचा भाग कुंपणविरहित आहे. गेल्या काही वर्षांत केंद्रीय गृहसचिव आणि बंगालचे मुख्य सचिव यांची सहापेक्षा जास्त वेळा भेट झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान म्हटले होते की, पश्चिम बंगाल सरकार खुल्या सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन देत नाही. जेव्हा जेव्हा कुंपण घालण्याची प्रक्रिया पुढे सरकते, तेव्हा तृणमूल काॅंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी आणि धार्मिक घोषणाबाजीचा अवलंब करतात. आता यातले काहीही घडणार नाही आणि कुंपणाचे काम निर्धोकपणे सुरु राहील, असे अधिकारी म्हणाले.