पुणे – मध्य रेल्वेच्या वतीने महिलांच्या सुरक्षित आणि आरामदायक प्रवासासाठी “मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) याची अंमलबजावणी होत आहे.
पाच विभागांतील 24 विशेष गाड्यांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे.
याला प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये पुणे-पटणा एक्स्प्रेस, मुंबई-नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, गोदान एक्सप्रेस, गोंदिया-मुंबई स्पेशल, मुंबई-हावडा एक्स्प्रेस आदी गाड्यांचा समावेश आहे.
या अभियानांतर्गत आरपीएफच्या महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार केले आहे. ही पथके वेगवेगळ्या बोगीमध्ये महिला प्रवाशांशी संपर्क साधणार आहेत.
यादरम्यान महिला प्रवाशांशी संवाद साधून प्रवासादरम्यान आवश्यकता भासल्यास आरपीएफ आणि जीआरपीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. याशिवाय प्रवासादरम्यान अनोळखी व्यक्तीने दिलेल्या खाद्यपदार्थांचा स्वीकारू नये, असे आवाहन देखील केले.