जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डाॅक्टरचा विनयभंग
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) : शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डाॅक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डाॅक्टारांनी हा प्रकार केला आहे.
याप्रकरणी एका 25 वर्षीय महिला डाॅक्टरने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





