फलटणमध्ये “पोक्‍सो’अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई – अल्पवयीन मुलगी शाळेत व क्‍लासला जाताना पाठलाग करुन ओळख वाढवून तसेच धमकी देऊन शारीरीक संबध ठेवल्याप्रकरणी एका 19 वर्षीय तरुणाच्या विरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात “पोक्‍सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तरुणास अटक करण्यात आली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, ओंकार आण्णासाहेब गायकवाड (वय 19 रा. विद्यानगर फलटण) याने दि. 1 सप्टेंबर 2018 ते दि. 11 नोव्हेंबर 2019 या काळात धमकी देऊन या अल्पवयीन मुलीबरोबर शारीरिक संबध ठेवले, अशी फिर्याद या मुलीने दाखल केलीआहे. फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसागर जलाशयातील बोटिंग गेल्या पंधरा दिवसापासून बंद असल्याने या बामणोली भागातील पन्नास बोट चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला निवेदन, प्रसंगी आंदोलनाचा इशारा अशा विविध माध्यमांतून बामणोली ते वासोटा या दरम्यान होणाऱ्या बोटिंग परवान्यासाठी ताकद पणाला लावली आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक विनिता व्यास यांच्याशी दोन बैठका होऊनही काहीच मार्ग निघत नसल्याने बोटचालक वैतागले आहेत.

बामणोली ते वासोटा हा दीड तासांचा लॉंचचा प्रवास असून प्रतिमाणशी साडेतीनशे रुपये शुल्क आकारले जाते. खासगी बोटचे शुल्क तीन ते चार हजार रूपये आकारले जाते. दरवर्षी बोटिंग व्यवसायाची साधारण चार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे येथील व्यावसायिक सांगतात. मात्र, राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनेनंतर जलसंपदा विभागाने शिवसागर जलाशयात बोटिंगला परवानगी नाकारल्यानंतर खऱ्या अर्थाने वादाला सुरवात झाली आहे.

नौकानयन व्यवस्थेला परवानगी देणारी मूळ यंत्रणा कोणती, या प्रश्‍नाचे उत्तर ना जलसंपदा विभागाकडे आहे ना जिल्हा प्रशासनाकडे. त्या मूळ प्रश्‍नावरच ठोस उपाययोजनांचा सावळा गोंधळ असल्याने वासोटा किल्ल्याचे पर्यटन ऐन हंगामात बंद आहे. वन विभागानेसुध्दा बामणोली येथे पर्यटकांना परवानगी देणारे पासकेंद्र मेट- इंदवली येथे हलवल्याने बोट चालक संतप्त झाले आहेत. त्यामुळे जलसंपदा विभाग, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वनविभाग व जिल्हा प्रशासनाची एक मॅरेथॉन बैठक होऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा शोधला जावा, अशी बोटचालकांची मागणी आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)