“निराश वाटतयं, पण हा नक्कीच शेवट नाही”; अभिनेता पार्थ समथानच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

Parth Samthaan | टीव्ही अभिनेता पार्थ समथान ‘कैसी ये यारियां’ या मालिकेमुळे लोकप्रिय झाला. काही दिवसांपूर्वी तो ‘सीआयडी २’ मध्ये दिसला होता. आता पार्थने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. पार्थ सध्या आयुष्यात कठीण प्रसंगातून जात आहे. यातच त्याने शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
पार्थ समथानने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिले, “मी काही महिन्यांपासून इन्स्टाग्रामवर सक्रीय नाही. होय, असा एक काळ येतो जेव्हा तुम्हाला अगदीच निराश वाटतं. काहीच करावंसं वाटत नाही, पण हा नक्कीच शेवट नाही. नाव लक्षात ठेवा.” त्याची ही पोस्ट पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत. पार्थला नक्की काय झालंय हे अजून स्पष्ट नाही. मात्र तो लवकरच यातून बाहेर पडेल आणि पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करेल, अशी आशा सर्वांनी व्यक्त केली आहे.
पार्थ समथानच्या करिअरबद्दल सांगायचं तर त्याने २०१२ मध्ये अभिनयात पदार्पण केलं. ‘ये है आशिकी’, ‘कैसी ये यारियां’,’प्यार तूने क्या किया’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकांमध्ये काम केलं. पार्थने रवीना टंडनच्या ‘घुडचढी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. ‘सीआयडी २’मधील त्याचा प्रवास जूनमध्ये संपला. आता सर्वांना पार्थ लवकरच एखाद्या नवीन प्रोजेक्टसोबत धमाकेदार कमबॅक करेल, अशी आशा आहे. Parth Samthaan |
हेही वाचा:
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांची एक्झिट; वयाच्या ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास




