Uddhav Thakceray | महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सातत्याने मोठे बदल पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने ‘ऑपरेशन टायगर’ला सुरूवात केली. ज्यात ठाकरे गटाला लक्ष करण्यात आले आहे. या ऑपरेशन टायगरमध्ये शिंदे गटाकडून आमदार, खासदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर, दुसरीकडे माजी लोकप्रतिनिधींसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे देखील अॅक्शन मोडवर आले आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंचे विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे राजन साळवी यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. भास्कर जाधव देखील नाराज असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु आहे. यातच आता पक्षातील माजी आमदार, अनेक पदाधिकारी ठाकरेंची साथ सोडत असताना उद्धव ठाकरे यांनी आमदार खासदारांची बैठक बोलवली आहे. Uddhav Thakceray | खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक ठाकरे गटाच्या खासदारांची 20 तारखेला तर आमदारांची 25 तारखेला बैठक बोलावण्यात आली आहे. खासदार, आमदारांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची 20 फेब्रुवारीला बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार सहभागी होतील. तर खासदारांची 25 फेब्रवारीला बैठक बोलवली आहे. मुंबईत मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीच्या माध्यमातून ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न करणार असल्याच्या चर्चा आहेत. Uddhav Thakceray | पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न ऑपरेशन टायगरमुळे पक्षाची पडझड रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी साथ सोडत असल्याने आता ठाकरे गटाकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी खासदारांची दिल्लीत बैठक घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरु होती. Uddhav Thakceray | हेही वाचा: भारतीय कंपनीची भन्नाट स्मार्टवॉच लाँच, 10 दिवसांची बॅटरी लाइफ-हेल्थ फीचर्ससह मिळेल बरंच काही, जाणून घ्या किंमत