ज्युलियन असांजने मागतला जामीन
नवी दिल्ली : विकिलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी तुरुंगात करोना विषाणूची लागण होण्याचा धोका असल्याने जामीन मिळावा, अशी मागणी केली आहे. असांज सध्या ब्रिटनमधील बेलमारश तुरुंगात आहे. दरम्यान इक्वाडोरियन दुतावासात त्याला पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या दोन मुलांचा जन्म झाला असल्याचेही त्यांच्या साथीदाराने सांगितले.
अमेरिकेच्या स्वाधीन केले जाऊ नये म्हणून असांज यांनी इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. मात्र इक्वेडोरने असांज यांना गेल्या वर्षी एप्रिलमध्ये राजकीय आश्रय देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना दुतावासातून बाहेर काढून ब्रिटनच्या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. करोना विषाणूचा फैलाव टाळण्यासाठी कारागृहातील काही श्रेणींमधील कैद्यांना बोरिस जॉनसन सरकार सोडत आहे.
परंतु त्यांच्यात प्रत्यर्पण कारवाईस सामोरे जाणाऱ्या कैद्यांचा समावेश आहे का हे स्पष्ट नाही.
असांजच्या वकील स्टेला मॉरिस यांनी नुकतेच दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. असांज आणि जरी असांजची सुटका झाली किंवा नाही, तरी आपण लवकरच विवाह करणार असल्याचे मॉरिस यांनी सांगितले आहे.