पाचव्या मुलाच्या इच्छेपोटी अंधश्रद्धेतून 8 वर्षीय मुलीची बापानेच केली हत्या; आधी काढले डोळे नंतर…

पाटणा – अंधश्रद्धेतून बापानेच 8 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर मुलीचे डोळे काढून त्यापासून ताईत बनविला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यातील पदम गावातील सफियाबाद पोलिस स्टेशनच्या हद्दित घडली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे. दिलीप कुमार असे आरोपी वडीलाचे नाव आहे.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, दिलीपच्या पत्नीचा गर्भपात झाला होता. यावेळी दिलीपला कोणत्याही परिस्थितीत पत्नीचा गर्भपात होऊ द्यायचा नव्हता. यामुळे त्याने हे सर्व आपला मित्र दशरथ आणि तनवीरला सांगितले. तनवीरनं खगडियाच्या मधुरा गावातील रहिवासी असलेल्या परवेज आलम याच्यासोबत दिलीपचा संपर्क करून दिला. परवेजने गर्भपात टाळण्यासाठी एका मुलीचे डोळे काढून त्याचे ताईत बनवून पत्नीला घालण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर दिलीपने निर्घृणपणे आपल्याच मुलीची हत्या केली. व तिचा एक डोळा काढून खगडिया येथे घेऊन गेले. यानंतर हा डोळा जाळून त्याच्या राखेचं ताईत बनवलं गेलं. हे ताईत दिलीपच्या पत्नीला घातल्यासाठी दिली.





