मेहुणीसोबत लग्न करण्यास नकार; जन्मदात्या बापाने केली चार मुलींची हत्या, नंतर…

बाडमेर – सासरच्यांनी मेहुणीसोबत लग्न करण्यास नकार दिल्याने जन्मदात्या पित्याने चार मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर बापानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना राजस्थानमधील बाडमेरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पुखाराम असे आरोपी पित्याचे नाव असून तो बाडमेरच्या पॉशल गावात राहतो. त्याने त्याच्या चार मुली, 8 वर्षीय जिया, 5 वर्षीय नोजी, 3 वर्षीय लक्ष्मी आणि दीड वर्षांची वसुंधरा यांना विष दिवून त्यांचा खून केला आहे.

तीन महिन्यांपुर्वी आरोपीच्या पत्नीचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यानंतर आरोपीच्या सासरच्यांनी त्याच्या चार मुलींना त्यांच्या घरी नेले. त्यामुळे आरोपी नैराश्यात गेला. त्यानंतर त्याने आपल्या सासरच्यांपुढे मेहुणीशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु सासरच्यांनी त्याला नकार दिला. त्यातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

सासरच्यांनी लग्नास नकार दिल्यानंतर आरोपीने आपल्या चार मुलीस घरी घेऊन आला. त्यानंतर चारही मुलींनी विष दिले व मुलींना एका पाण्याच्या टाकीत टाकले. त्यानंतर त्याने स्वता:ने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाचला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.