पिंपरी | बाप म्हणजे देवाची प्रतिकृती – साठे

पिंपरी, (प्रतिनिधी)- प्रत्येक मुलाने आपल्या पित्यावर एवढं प्रेम करा की जेणेकरून त्यांना कुठले दुःख होणार नाही. त्याचबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार आपल्या आई-वडिलांचा सन्मान करा, बाप म्हणजे देवाची प्रतिकृती देवानेच आपल्या घरात ठेवली आहे. त्यामुळे त्यांची आज्ञा पाळावी.
या संदेशानुसार प्रत्येकाने आपलं मन देवाकडे वळून व देवाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे वागणे व आपल्या आई-वडिलांचा सन्मान करावा, असे आवाहन सेंट मेरी कॅथिड्रल चर्चमध्ये रेव्ह. माजी बिशप विजय साठे यांनी संदेशाद्वारे केले.
‘जागतिक फादर्स डे’ निमित्त दापोडी, सांगवी, फुगेवाडी व कासारवाडी येथे सामाजिक संस्था व विविध चर्चमध्ये वडिलांचा सन्मान करत, त्यांना केक भरवून मुलांनी आपल्या वडिलांना फादर्स डे च्या शुभेच्छा दिल्या.
याव्हे निस्सी ख्रिश्चऩ असोशिएशनचे अध्यक्ष नितीन गोरडे यांनी फादर्स डे निमित्त प्रार्थना करून सर्व वडिलांसाठी निरोगी आरोग्यची प्रार्थना केली. तसेच केक कापून, भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी नितीन गडकरी, प्रकाश नानीवडेकर, अनिल गडकरी, विल्यम चंदनशिव आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित वडीलधार्यांना चर्च कमिटीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी प्रत्येक मुलीने आपल्या वडिलांना गोड तोंड करून फादर डे निमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रिया ढाले, सृष्टी पतारे, ख्रिस्तीना गोरडे, वर्षा पठारे, रूपा गवारे, रितिका चांदणे, प्रशंसा चांदणे, कीर्त पाटोळे, शर्वरी बर्वे एंजल बनकर, रिया पाटोळे या मुलींनी आपल्या वडीलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी लवीना चंदनशिव, सृष्टी साळवे आदी उपस्थित होते.





