मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या पित्याला अटक
Updated On:

पिंपरी -पोटच्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. पीडित 12 वर्षीय मुलीच्या आईने याप्रकरणी मंगळवारी (दि. 15) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला घरकामासाठी घराबाहेर गेली असता त्यावेळी फिर्यादीचा पती आणि पीडित 12 वर्षीय मुलगी घरी राहत असत. रविवारी (दि. 13) फिर्यादी रात्री घरी आल्यानंतर आरोपी पतीने दारु पिऊन शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी पीडित मुलगी खूप घाबरली होती.
त्यानंतर सोमवारी (दि. 14) सकाळी फिर्यादी कामावर जात असताना मुलीने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबाबत फिर्यादी आईला सांगितले. तू स्वत:च्या पोरीसोबत असे का केले, असे फिर्यादी महिलेने आरोपी पतीला विचारले असता तो निघून गेला. पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली.





