Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. स्वतःच्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा दाबून खून करणाऱ्या निर्दयी बापाला आळेफाटा पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत अटक केली आहे. ही धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. (Pune Crime News) आरोपीने मुलीचा मृतदेह जंगलात फेकून दिल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. गायकवाड वस्ती, मोशी) याने ५ मे रोजी आपली दोन मुले आर्यन (५.५ वर्षे) आणि हर्षदा (३.५ वर्षे) यांना फिरायला घेऊन जात असल्याचे सांगून घराबाहेर नेले होते. (Pune Crime News) चिमुकल्या आर्यनमुळे झाला उलगडा त्यानंतर ६ मे रोजी सकाळी संतवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गालगतच्या जंगलातून आर्यन हा एकटाच रडत बाहेर येताना स्थानिकांना दिसला. चौकशी केल्यानंतर त्याने “पप्पांनी मला आणि बहिणीला जंगलात आणले होते, पण रात्री मला तिथेच सोडून गेले,” असे सांगितले. (Pune Crime News) या माहितीवरून आळेफाटा पोलिसांनी मुलाच्या आजोबांना संपर्क केला. दरम्यान, आरोपी सागर शिंदे घरी परतला असता त्याने मुलं चाकण येथील रूमवर असल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. (Pune Crime News) मृतदेह जंगलात फेकला मात्र, कुटुंबीयांनीच त्याच्यावर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत सागर शिंदे याने मुलगी हर्षदाचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. तसेच मृतदेह संतवाडी येथील जंगलात फेकून दिल्याचे सांगितले. (Pune Crime News) त्यानंतर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जंगलात शोधमोहीम राबवून बुधवारी सकाळी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह शवविच्छेदनासाठी आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. (Pune Crime News) पोलिसांची ‘धडाकेबाज’ कारवाई या प्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३(१), १०९, ९३ आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.