मुंबई हादरली ! लोकलसमोर उडी घेऊन पिता – पुत्राची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील भाईंदर या ठिकाणी रेल्वेसमोर उडी घेऊन एका पिता – पुत्राने आत्महत्या केली आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अचानक लोकलसमोर दोघेही आल्याने लोकोपायलटने प्रयत्न करूनही लोकल थांबवता आली नाही. आत्महत्या केलेले दोघेही नालासोपारा येथील रहिवाशी असल्याचे समजत आहे.
काय घडले नेमके?
भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरून उतरून काही अंतर चालून गेल्यावर दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले.
मृत मुलाचे नाव नाव जय मेहता असे आहे. या प्रकरणी वसई पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. रेल्वे भाईंदर स्टेशनमधून निघताच दोघांनीही ट्रॅकवर झोकून दिलं. दोघांच्या अंगावरून लोकल गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. या बाप – लेकाने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्याकडे कोणतीही सुसाईड नोटदेखील आढळून आलेली नाही.





