पुणे -“औरंगाबाद’चे नाव “छत्रपती संभाजीनगर’ करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची नुकतीच मंजुरी मिळाली. या नामांतराचा प्रवास ऐतिहासिक आणि रंजक आहे. साधारणपणे सन 1988 पासून “औरंगाबाद’ शहराचे नामकरण “संभाजीनगर’ आणि “उस्मानाबाद’ शहराचे नामकरण “धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. मुघल शासक औरंगजेबाच्या नावाला विरोध करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “संभाजीनगर’ची घोषणा केली. तेव्हापासून शिवसेना आणि संबंधित प्रकाशने, शिवसैनिक आणि काही संघटना औरंगाबादचा उल्लेख “संभाजीनगर’ असाच करायचे. पुढे 1995 मध्ये शिवसेना-भाजप युती नामांतराचा निर्णय घेतला होता. पण, त्यानंतरच्या सरकारने तो प्रस्ताव पुढे जाऊ दिला नाही. पुढे नामांतराबाबत मागण्या, घोषणा झाल्या. पण, ठोस निर्णय झाला नव्हता. दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी “औरंगाबाद’ शहराचे नामकरण “संभाजीनगर’ करण्याची मागणी मधल्या काळात लावून धरली होती. पुढे “मविआ’ सरकारने या नामांतराबाबत निर्णय घेण्याच्या हालचाली सुरू केल्या. पण, सरकार कोसळले. नंतर सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने फक्त “संभाजीनगर’ऐवजी विस्तार करत “छत्रपती संभाजीनगर’ असा प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजूर केला आणि केंद्र शासनाकडे पाठवला. तेथून दि.24 रोजी या नाव बदलास मंजुरी मिळाली आहे. काय आहे इतिहास या शहराचा इतिहास सातवाहन राजवटीपर्यंत आढळतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही याचा उल्लेख आहे. सातवाहनांच्या काळात खाम नदीकाठावर अनेक खेडी होती. त्यापैकी एक “खडकी’ हे आजचे “छत्रपती संभाजीनगर’. येथे आजही “खडकेश्वर’ महादेवाचे भव्य देऊळ आहे. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीचे राजे कृष्णदेवराय यांच्या वंशजांचे राज्य होते. काही इतिहासकारांच्या मते, 1604 मध्ये निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने “औरंगाबाद’ हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून “फतेहनगर’ ठेवले होते, असेही सांगितले जाते. असे झाले नामांतर 1626 : मलिक अंबरचा मुलगा फतेह खानने फतेहनगर नाव दिले. 1636 : शहाजहान बादशहाने औरंगजेबाला येथे पाठवले. त्याने “खुजिस्ता बुनियाद’ नाव दिले. 1657 : औरंगजेबाने पुन्हा नाव बदलून “औरंगाबाद’ केल. 1988 : औरंगजेबाच्या नावाला विरोध करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “संभाजीनगर’ची घोषणा केली. 1995 : युती सरकारने घेतला दोन्ही शहरांच्या नामांतराचा निर्णय घेतला होता. पण नंतर प्रकरण कोर्टात गेले. 1999 : कॉंग्रेस सरकारने नामांतराचा प्रस्ताव मागे घेत असल्याचे कोर्टात सांगितले. 29 जून 2022 : उद्धव ठाकरे सरकारची संभाजीनगरच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळात मंजुरी. 16 जुलै 2022 : “छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करून शिंदे सरकारकडून मंजुरी. 24 फेब्रुवारी 2023 : “छत्रपती संभाजीनगर’ नामविस्तारास केंद्र सरकारची मंजुरी काय आहे इतिहास या शहराचा इतिहास सातवाहन राजवटीपर्यंत आढळतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही याचा उल्लेख आहे. सातवाहनांच्या काळात खाम नदीकाठावर अनेक खेडी होती. त्यापैकी एक “खडकी’ हे आजचे “छत्रपती संभाजीनगर’. येथे आजही “खडकेश्वर’ महादेवाचे भव्य देऊळ आहे. चौदाव्या शतकापर्यंत या परिसरात देवगिरीचे राजे कृष्णदेवराय यांच्या वंशजांचे राज्य होते. काही इतिहासकारांच्या मते, 1604 मध्ये निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने “औरंगाबाद’ हे शहर वसवले आहे. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. मलिक अंबरने फक्त त्याचे नाव बदलून “फतेहनगर’ ठेवले होते, असेही सांगितले जाते.