Navnath Ban : नुकताच देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पश्चिम बंगालच्या मतदारांनी भाजपवर विश्वास टाकला आणि पंधरा वर्षांची माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून टाकली. पाच पैकी तीन राज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला. मात्र, या निकालात पश्चिम बंगालचा विजय विशेष ठरला. निवडणुकींच्या निकालावर मत व्यक्त करतान उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेचा समाचार भाजपच्या एका नेत्याने घेत संजय राऊतांनी केलेल्या एका व्यक्तव्याची खिल्ली उडवली आहे. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव ही मोदी यांच्या पतनाची सुरूवात आहे. दिवा विजताना त्याची वात मोठी होते मग तो विजतो, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. या टीकेचा समचार घेत भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि मुंबईचे नगरसेवक नवनाथ बन यांनी दिवा विझताना मोठा होतो, पण संजय राऊत तुम्हीच शेवटचे फडफडणारे दिवे आहात, अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे. नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? “भारतीय जनता पक्ष खास करून नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ हे 365 दिवस निवडणुकीची प्रॅक्टिस करत असतात. 365 दिवस रोज निवडणुका कशा लढायच्या आणि कशा जिंकता येतील, यावर त्यांचं काम चाललेलं असतं. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव ही मोदी यांच्या पतनाची सुरूवात आहे. दिवा विजताना त्यांची वात मोठी होते मग तो विजतो. हे हिंदुत्वाचे शास्त्र आहे हे मी हिंदुत्ववादी भाजपला सांगतो. मोदींनी खरे बोलण्याचे धडे घेतले पाहिजे.” नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर “भाजपचा विजय झाल्यावर राऊत असं म्हणाले की दिवा विझताना मोठा होतो, पण संजय राऊत तुम्हीच शेवटचे फडफडणारे दिवे आहात. तुमचं अस्तित्व संपवायचं, मशाल विझवायची आणि मगच दिवा विझणार हे सुपारी घेऊन सांगितलं आहे,” राऊतांच्या वक्तव्याची उडवली खिल्ली भाजप जनतेच्या जीवावर निवडून येते, तुमच्यासारखं घरात बसण्याचे काम करत नाही, ती भाजपची परंपरा नाही. संजय राऊतांनी नशीब जागतिक महायुद्धासोबत किंवा जपानच्या अणुबॉम्बसोबत तुलना केली नाही हे बरं झालं. काँग्रेसवर जहरी टीका काँग्रेस हा अजगर आहे, जो आपल्या सहकाऱ्यांना गिळंकृत करतो. खासदारकीची चिंता संजय राऊतांना आहे, म्हणून ते अजगराला जवळ करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये इंडी आघाडी नव्हतीच, ती मंच नसलेली आघाडी होती, अशी जहरी टीकाही नवनाथ बन यांनी केली आहे. हेही वाचा : Stock Market: शेअर बाजारात मोठी उसळी ; सेन्सेक्स ४०६ अंकांनी वधारला ; निफ्टीमध्येही १३८ अंकांची वाढ