दक्षिण सुदानमध्ये विमान अपघात; केवळ एक जण बचावला, मृतांमध्ये भारतीय नागरिकाचा समावेश

South Sudan Plane Crash | दक्षिण सुदानमध्ये विमान अपघात झाल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या विमानात 21 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. या अपघातातून केवळ एक जण बचावला. मृतांमध्ये दोन चीनी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. अपघात झाला तेव्हा विमान युनिटी ऑइलफील्ड विमानतळावरून राजधानी जुबाकडे उड्डाण करत होते. युनिटी राज्याचे माहिती मंत्री गटवेच बिपल यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
युनिटी राज्याचे माहिती मंत्री गॅटवेच बिपल यांनी सांगितले की, विमानात बसलेले सर्व प्रवासी ग्रेटर पायोनियर ऑपरेटिंग कंपनीचे (GPOC) तेल कर्मचारी होते. ते लाईट एअर सर्व्हिसेस एव्हिएशन कंपनीद्वारे चालवले जात होते. ज्यामध्ये चायना नॅशनल पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि सरकारी मालकीचे नाईल पेट्रोलियम समाविष्ट आहे. मात्र या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. South Sudan Plane Crash |
या घटनेनंतर मृतांची संख्या सुरुवातीला 18 असल्याचे सांगण्यात आले. परंतु नंतर आणखी दोन जखमी प्रवाशांचा यात मृत्यू झाला, त्यामुळे मृतांचा आकडा 20 वर गेला. यात भीषण अपघातातून केवळ एक जण बचावला आहे. सोशल सोशल मीडियावर या विमान अपघाताचे फोटो देखील व्हायरल होत आहे. एका शेतात या विमानाचे अवशेष पडल्याचे फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. South Sudan Plane Crash |
दक्षिण सुदानमध्ये अनेक विमान अपघाताच्या घटना घडल्या?
गेल्या काही वर्षांत दक्षिण सुदानमध्ये अनेक विमान अपघात झाले आहेत. 2015 मध्ये, रशियन बनावटीचे एक मालवाहू विमान राजधानी जुबा येथून उड्डाण घेत असताना कोसळले होते. विमान कोसळून 12 लोकांचा मृत्यू झाला होता. तर सप्टेंबर 2018 मध्ये, राजधानी जुबाहून यिरोल शहरात जाणारे विमान कोसळले. ज्यात 19 जणांना आपला जीव गमवावा लागला. हे विमान अपघात ओव्हरलोडिंग किंवा खराब हवामानामुळे होतात. South Sudan Plane Crash |
हेही वाचा:

