‘मी खलिस्तानी आणि पाकिस्तानीसुद्धा …’ ; फारुख अब्दुल्ला असे का म्हणाले?

Farooq Abdullah । जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत केलेल्या युतीवर फारुख अब्दुल्ला यांची प्रतिक्रिया आली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी, ‘एनसी आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर राज्यात खूप चांगले बदल होतील.” असे त्यांनी म्हटले. त्याचबरोबर नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यावर भाजपच्या प्रतिक्रियेवर फारुख यांनी पलटवार करत “मी तर खूप काही आहे मी खलिस्तानी आणि पाकिस्तानी दोन्ही आहे.”असे म्हटले.
जम्मू-काश्मीरमधील निवडणुका जाहीर झाल्यानंतर फारुख अब्दुल्ला चांगलेच सक्रिय झाले असून त्यांचा दौरा सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावर ते काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची कामगिरी चांगली असेल.
#WATCH | National Conference president Farooq Abdullah says, “This time (people are in a) very good mood. National Conference and Congress will have a very good (performance) and we will get success…” pic.twitter.com/YHzcAOD39Y
— ANI (@ANI) August 27, 2024
जमात-ए-इस्लामीवर केले ‘हे’ वक्तव्य Farooq Abdullah ।
जमात-ए-इस्लामीही या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहे. यावर फारुख म्हणाले की, ‘ते निवडणूक लढवत आहेत ही आनंदाची बाब आहे. गुपचूप कुणाला मत देण्यापेक्षा स्वतः उभे राहणे चांगले. पुढे या. या राज्याच्या भल्यासाठी निवडणूक लढवा.’ असे त्यांनी यावेळी म्हटले.
जाहीरनाम्यावर भाजपच्या प्रतिक्रियेवर अब्दुल्ला यांचा टोला Farooq Abdullah ।
भाजपने नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याचे वर्णन पाकिस्तान समर्थक असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना फारुख अब्दुल्ला उपहासात्मक स्वरात म्हणाले की, “मी खूप काही आहे. मी पण खलिस्तानी आहे. मी पाकिस्तानी आणि अमेरिकन एजंट आहे. आणि जर काही उरले असेल तर तेही मीच आहे.” जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सने काँग्रेससोबत सर्व 90 जागांसाठी युती केली आहे. या आघाडीच्या निर्णयानंतर नॅशनल कॉन्फरन्सनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.





